चिपळूणमध्ये आशिष शेलार यांची भास्कर जाधवांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट; प्रत्यक्ष भेट मात्र झाली नाही


राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बुधवारी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान चिपळूण येथील आमदार भास्कर जाधव यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. कार्यालयातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी आमदार भास्कर जाधव आणि आशिष शेलार यांची भेट होणार होती. मात्र, शेलार यांच्या आगमनास विलंब झाल्याने भास्कर जाधव नियोजित पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही.

या भेटीचा नेमका अजेंडा अधिकृतपणे समोर आलेला नसला, तरी दोन भिन्न राजकीय पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या संभाव्य भेटीमुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, नियोजित भेट न झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांच्या या सदिच्छा भेटीची चिपळूणसह रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button