
भाटे पुलाजवळ अंधारात अपघात; महिलेच्या दुचाकीची पोलिसांच्या वाहनाला धडक
रत्नागिरी शहराजवळील भाटे पुल परिसरात सोमवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकी आणि पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. या घटनेत दुचाकी चालवणारी महिला किरकोळ जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाटे पुलाजवळ नवीन जेटीचे काम सुरू असलेल्या परिसरात हा अपघात घडला. संबंधित महिलेची दुचाकी रॉंग साईडने येऊन पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, भाटे परिसरातील विजेच्या खांबावरील वायर तुटल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडाला होता. त्यामुळे परिसरात दृश्यमानता कमी झाली होती. अशा अंधारात हा अपघात घडल्याने परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
या घटनेबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.




