
संगमेश्वरजवळील सोनवी पुलामुळे मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला
संगमेश्वर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलावरील काही कामे अद्याप सुरू असून, मुसळधार पावसात हा काक्रिटच काम सुरू असताना त्याच मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर तसेच पुलाच्या सुरक्षिततेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, संबंधित ठिकाणी पुरेसे सूचना फलक, वेगमर्यादा किया सुरक्षिततेच्या सूचना नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वीही सोनवी पुलावरील वाहतूक व्यवस्थापनातील त्रुटींमुळे काही अपघात घडल्याच सांगितले जात असून, त्या घटनांमधून धडा न घेता पुन्हा अपूर्ण मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्यात आल्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.




