
वरुणराजाने दडी मारल्यामुळे अनेक तालुक्यात शेतीची कामे खोळंबली
वरुणराजाने दडी मारल्यामुळे अनेक तालुक्यात शेतीची कामे खोळंबली आहेत. शेतकरी राजा चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. काही ठिकाणी लावणीसाठी काढलेली रोपे सुकू लागली आहेत. तर काही ठिकाणी शेतकरी पंपाद्वारे पाणी घेवून लावणी लावत असल्याचे चित्र आहे.
संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून ग्रामीण भाग सर्वाधीक आहे. येथील ग्रामस्थांचा शेती हा, मुख्य व्यवसाय आहे. बदलत्या वातावरणाचा फटका मात्र शेतकर्यांना सहन करावा लागत आहे. भात लावणीची कामे रंगात असताना गेले पाच दिवस पाऊस अचानक गायब झाला आहे. सकाळ पासून सायंकाळ पर्यंत कडकडीत न असे चित्र तालुक्यात आहे. पेरणी झाल्यानंतर पाऊस गायब होता. आता लावणीची कामे जोमात सुरू असताना पुन्हा पाऊस गायब झाला आहे. यामुळे शेतकरी अक्षरश: हैराण झाले आहेत.




