कोळंबे हायस्कूल दरडग्रस्त भागाची सभापती शर्वरी वेल्ये यांची पाहणी; ६ वर्गखोल्या रिकाम्या करण्याचे आदेश..


संगमेश्वर :- कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलच्या मागे दरड कोसळल्याची घटना समोर येताच संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी आनंद लोकरे आणि शिक्षण विस्तार अधिकारी त्रिभुवने हे अधिकारी उपस्थित होते.

शौचालय जमीनदोस्त, ६ वर्गखोल्या धोकादायक

सभापती आणि अधिकाऱ्यांच्या पाहणीत या मानवनिर्मित आपत्तीचे भयावह वास्तव समोर आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कोसळलेल्या दरडीच्या तडाख्यात सापडून शाळेचे शौचालय पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. तसेच, शाळेच्या मुख्य इमारतीमधील ६ वर्गखोल्या अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, हे लक्षात घेता सभापती शर्वरी वेल्ये यांनी या ६ वर्गखोल्या त्वरित रिकाम्या करण्याचे आणि विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे सक्त आदेश प्रशासनाला दिले आहेत.

शनिवारी पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

या गंभीर विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यासाठी, शनिवारी (११ जुलै) कोळंबे ग्रामस्थ आणि शिक्षण संस्थेचे पदाधिकारी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सभापती शर्वरी वेल्ये यांनी दिली.

याबाबत बोलताना सभापती शर्वरी वेल्ये म्हणाल्या की, “शाळेचे झालेले नुकसान आणि सुमारे ३५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आम्ही अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. वर्गखोल्यांचे तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी शनिवारी पालकमंत्र्यांकडे हा विषय मांडला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button