
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल खरेदीवरील निर्बंध हटवलेनवीन नियम १ जुलैपासून लागू होणार
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी खरेदीबाबत बदल लागू केला आहे. मोठ्या व्यावसायिक खरेदीदारांना लागू केलेले इंधन खरेदीचे नियम आता केंद्र सरकारकडून हटवण्यात आले आहेत. यापूर्वी व्यवासायासाठी पेट्रोल- डिझेलची खरेदी करणाऱ्यांना पेट्रोल पंपावर इंधन खरेदी करण्यास तात्पुरते नियम लागू केले होते. या नियमाअंतर्गत एका निश्चित मर्यादेच्या पलिकडे व्यावसायिकांना पेट्रोल आणि डिझेल खरेदी करता येत नव्हते. पण आता व्यावसायिकांना पेट्रोल-डिझेल खरेदी करताना कोणताही अडथळा येणार नाही आहे. त्यांना पेट्रोल पंपावरून कोणत्याही मर्यादेशिवाय पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला.आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टींवर केंद्र सरकारकडून निर्बंध लादण्यात आले होते. पण आता युद्धाची परिस्थिती हळूहळू संपत असल्यामुळे सरकारकडून देखील महत्वपूर्ण पाऊलं उचलली जात आहेत. हे युद्ध निवळत चालल्यामुळे आता इधन पुरवठा देखील पूर्वपदावर येत आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅस पुरवठा सुरळीत होत असल्यामुळे आता केंद्र सरकारने देखील नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. सर्वसामान्यांना इंधन पुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी केंद्र सरकारने व्यावसायिक कामासाठी लागणाऱ्या इंधनावर मर्यादा आणली होती. त्यामुळे व्यावसायिक चिंतेत आले होते. पण आता त्यांची चिंता दूर झाली आहे




