रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न – डॉ. संदीप सखाराम करे रोटरी वर्ष २०२६-२७ चे नवे अध्यक्ष

रत्नागिरी, दि. २८ जून : रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन च्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी हॉटेल संगम रेसिडेन्सी येथे उत्साहपूर्ण वातावरणात आणि मोठ्या दिमाखात पार पडला.

गेली २१ वर्षे सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांद्वारे रत्नागिरीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या या सोहळ्यास इंस्टॉलेशन ऑफिसर तथा प्रमुख पाहुणे रोटेरियन श्री. सुहास जोशी (DGND 3172), रोटेरियन श्री. अशोक नाईक (DGND 3171), असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन श्री. श्रीकांत भुरके (२०२५-२६) आणि असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन श्री. अविनाश पालशेतकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मावळत्या अध्यक्षा डॉ. सौ. स्वप्ना करे यांनी आपल्या मनोगतात वर्षभरातील कार्याचा आढावा घेत सर्व सहकारी, सदस्य आणि कुटुंबीयांचे सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी रोटेरियन श्री. राजेंद्र कदम, श्री. वामन सावंत आणि श्री. सीताराम सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

क्लबचे सेक्रेटरी रोटेरियन श्री. राजेंद्र कदम यांनी वार्षिक अहवाल सादर करताना ग्रामीण भागातील वैद्यकीय शिबिरे, शाळकरी मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यशाळा, हिरकणी कक्षांना खुर्च्यांचे वाटप, गरोदर व स्तनदा मातांना प्रोटीन पावडरचे वितरण, शैक्षणिक साहित्य वाटप तसेच महिला बचत गटांसाठी आर्थिक साक्षरता कार्यक्रम अशा विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला.

यानंतर रोटेरियन श्री. सुहास जोशी यांच्या हस्ते डॉ. संदीप करे यांना अध्यक्षपदाची पिन व कॉलर प्रदान करून २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्यात आली. तसेच रोटेरियन श्री. सीताराम सावंत यांनी सेक्रेटरी, तर रोटेरियन विनायक निकम यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला.

नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संदीप करे यांनी आगामी वर्षासाठी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन केले असून परस्पर विश्वास, मैत्री, सहकार्य आणि समर्पणाच्या भावनेतून क्लबचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सोहळ्यात डॉ. सौ. संघमित्रा फुले, डॉ. स्नेहल अंधारे, डॉ. अमिता हिप्पळगावकर आणि श्री. प्रदीप साळुंखे यांचा नवीन सदस्य म्हणून रोटरी परिवारात समावेश करण्यात आला.

प्रमुख पाहुणे रोटेरियन डॉ. सुहास जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मावळत्या अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि वैद्यकीय व्यवसाय सांभाळत त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संदीप करे यांना आगामी वर्षासाठी शुभेच्छा देत क्लबच्या सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी, रोटेरियन्स, त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच इनरव्हील क्लबच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कविता सावंत आणि रिटेरियन आकांक्षा हिराकांत साळवी यांनी केले, तर सेक्रेटरी रोटेरियन श्री. सीताराम सावंत यांनी उपस्थित मान्यवर व सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button