रत्नागिरी शहरातील जे.के.फाईल्स समोर अशोक लेलँडच्या लाइट कमर्शियल व्हेईकल (एलसीव्ही) विभागाच्या ‘लवेकर मोटर्स’ या नव्या शोरूमचे उद्घाटन


रत्नागिरी शहरातील जे.के.फाईल्स समोर अशोक लेलँडच्या लाइट कमर्शियल व्हेईकल (एलसीव्ही) विभागाच्या ‘लवेकर मोटर्स’ या नव्या शोरूमचे उद्घाटन आज (२५ जून) अशोक लेलँडचे बिझनेस हेड विप्लव शहा यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.
याप्रसंगी अशोक लेलँडचे झोनल मॅनेजर अतुल क्षीरसागर, रिजनल मॅनेजर गौरव ठाकरे, एरिया सेल मॅनेजर अभिषेक नाडकर्णी, सुनील पाटील, अखिलेश चोपडे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अशोक लेलँडच्या समाधानी ग्राहकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आरटीओचे अधिकारी शेखर लवेकर, प्रकाश मयेकर, सचिन शिंदे, दैवज्ञ पतपेढीचे विजय पेडणेकर, संतोष भुर्के, प्रमोद खेडेकर, करसल्लागार उज्ज्वल बापट, वरुण फडके, बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर सुधाकर गोन्नाडे, प्रदीप गायकवाड यांच्यासह विविध फायनान्स, इन्शुरन्स कंपन्यांचे व बँकांचे अधिकारी, उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लवेकर मोटर्सचे संचालक संदीप लवेक, श्रेयस लवेकर, कुणाल लवेकर, रश्मी लवेकर, राजेश्वरी पातकर आणि अनुरूप पातकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने १५ ग्राहकांना नव्या वाहनांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम यशस्वी ठरला. उपस्थितांनी लवेकर मोटर्सच्या या नव्या उपक्रमास शुभेच्छा देत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button