माझ्या विरोधी पक्षनेतेपदाची काळजी मिलिद नार्वेकरांना असल्याने मी चिंतामुक्त : आ. भास्कर जाधव


आ. भास्कर जाधव यांनी नार्वेकर कोण लागून आलाय अशी टिप्पणी केली होती. त्यावर मिलिंद नार्वेकर आणि भास्कर जाधव यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या प्रतिक्रियेनंतर राहुल नार्वेकर यांनी आपल्या एक्स हॅण्डलवर भास्कर जाधव हे सध्या अस्वस्थ झाले असून त्यांच्या अस्वस्थतेमुळे शिवसैनिकांचे नुकसान होते. त्यांना मुख्यमंत्र्यांनी लवकर विरोधी पक्षनेते करावे अशी पोस्ट केली होती. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह आणखीनच चव्हाट्यावर आला.
काल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार जाधव आणि आमदार नार्वेकर या दोघांनाही पत्रकारांनी या संदर्भात विचारणा केली. आमदार जाधव यांनी यासंदर्भात खुलासा करताना सांगितले की, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे माझ्या डोक्यात बसले आहेत. मी वर्धापन दिनाच्या दिवशी सभागृह बाहेर होतो तेव्हा एक महिला पत्रकार माझी प्रतिक्रिया घेत असतानाच वाहनाचा हॉर्न सतत सुरू होता. त्यावेळी ही गाडी नार्वेकरांची आहे अशी माहिती समजल्यावर माझ्या डोक्यात बसलेले राहुल नार्वेकर यांचीच ही गाडी असावी असे समजून आणि राहुल नार्वेकर यांना उद्देशून कोण लागून आलाय असे आपण म्हटले. अशी स्पष्टोक्ती आमदार जाधव यांनी केली. मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या पोस्टवर त्यांनी म्हटले की, विरोधी पक्षनेता पदासाठी मिलिंद नार्वेकर यांना माझी काळजी असल्यामुळे मला आता हे पद लवकरच मिळेल अशी आशा वाटते. त्यामुळे मी चिंतामुक्त आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button