
देवरूख पर्शरामवाडी धरणाला गळती, नागरिकांसमोर पाणी संकट
नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी देवरूख तालुक्यातील पर्शरामवाडी व धावडेवाडी धरणाची उभारणी करण्यात आली आहे. पर्शरामवाडी येथे पाण्याची विहीर, जॅकवेल असल्याने या धरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. सन २००५ मध्ये पर्शरामवाडी धरणाची उभारणी करण्यात आली. २५ वर्षाचा कालावधी लोटल्याने हे धरण नादुरूस्त होवू लागले आहे. धरणाला मध्यभागी मोठी गळती लागली आहे. भूगर्भातून धो-धो पाणी हे बाहेर पडत आहे. मोठा मोठा खळखळ आवाज कानी पडतो.
धरणासाठी उभारल्या बंधार्याला भगदाडे पडू लागली आहेत. पावसाळ्यात बावनदी दुथडी भरून वाहत असते. याचा सामना करत हा बंधारा २५ वर्षे उभा आहे. हाच बंधारा ढासळत चालल्याचे चित्र आहे. हा बंधारा फुटल्यास नागरिकांना पाणी पाणी करण्याची वेळ येईल, अशी स्थिती आहे. धरण गळती लागल्याचे प्रशासनाच्याही निदर्शनास आले आहे. दुरूस्तीसाठी एका ठेकेदाराला घटनास्थळी नेण्यात आले होते. मात्र त्याने हे काम आपल्याकडून होणार नाही असे सांगितल्याचे समजते.www.konkantoday.com




