रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाची देणी रखडली


रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागासाठी भाडेतत्त्वावर कार्यरत असलेल्या वाहनधारकांवर सध्या मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा आणि इतर शासकीय कामांसाठी वापरण्यात येणार्‍या ११ वाहनांचे तब्बल ७३ लाख ८१ हजार ६०४ रुपये इतके भाडे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे वाहनधारकांना बँकेचे हप्ते, इंधन खर्च आणि वाहनांच्या देखभालीचा खर्च भागवणे कठीण झाले असून शासनाकडून थकीत निधी तातडीने मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button