गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पोर्पोइज मृतावस्थेत आढळला


रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हा सस्तन प्राणी मृतावस्थेत आढळला. थोडासा डॉल्फिनसारखा दिसणारा हा मासा मृत झाल्याने किनारी भागात दुर्गंध येत होतो. तो कशामुळे मृत पावला याचे निदान होऊ शकले नाही. भरतीच्या वेळेस तो पुन्हा समुद्रात वाहून गेला.
इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज याचे शास्त्रीय नाव नेओफोकेना फोकेनोइड्स आहे. अनेकदा याला डॉल्फिन किंवा डुकरा मासा म्हणून ओळखले जाते. पॉरपॉईज या प्राण्याला कोणतीही लांब चोच नाही, त्याचे डोके गोल आहे आणि पाठीवर कोणताही कल्ला दिसत नाही. यामुळेच याला ‘फिनलेस पॉरपॉईज’ म्हणतात. हा प्रामुख्याने हिंदी महासागर आणि पश्चिम पॅसिफिक महासागर परिसरात आढळतो. लांबी साधारण 1.5 ते 2 मीटर असते. मासे आणि लहान समुद्री जीव हे याचे मुख्य अन्न आहे. प्रदूषण, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे आणि अधिवास नष्ट होणे यामुळे हा प्राणी धोक्यात असल्याचे मानले जाते.
हा प्राणी दुर्दैवाने मृत अवस्थेत गणेशगुळे किनाऱ्यावर वाहून आला. हा अत्यंत संरक्षित श्रेणीमध्ये येतो. हा मृत प्राणी कुजण्यास सुरवात झाल्याने त्या भागात दुर्गंध येत होता. संध्याकाळच्या वेळेस हा मासा भरतीच्या एका जोरदार लाटेमुळे पुन्हा समुद्रात वाहून गेला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button