पाणीपुरवठा सुरळीत, जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील कंत्राटी कामगारांचे जीवन विस्कळीत


जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेतील कंत्राटी कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या नेतृत्वाखाली येत्या दि. २२ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थाच अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी केली आहे.
जिल्हा परिषद रत्नागिरीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत कार्यरत असलेली जयगड प्रादेशिक नळपाणी योजना १४ ग्रामपंचायतींसाठी महत्त्वाची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, ही योजना सुरळीत ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या १४ कंत्राटी कामगारांना गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाकडून कंत्राटदाराला आवश्यक निधी आणि सुविधा वेळेवर उपलब्ध करून दिल्या जात असतानाही त्याचा लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नाही. सध्याच्या महागाईच्या काळात कामगारांना केवळ १० ते १२ हजार रुपये मानधन मिळत असून त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे. या प्रश्नाबाबत गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचा दावा संस्थेने केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button