रत्नागिरीत अत्याधुनिक नेव्हल एनसीसी भवनासाठी ४२.४३ कोटींच्या प्रकल्पाला मान्यता


राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) २ महाराष्ट्र नेव्हल युनिटसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कुवारबाव येथे अत्याधुनिक आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असे भव्य नेव्हल एनसीसी भवन उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता मिळाल्याने आता प्रत्यक्ष बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यापूर्वीच या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली होती. दि. ७ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार या प्रकल्पासाठी तब्बल ४२ कोटी ४३ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर कोकण प्रादेशिक विभाग, मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाने दि. ९ मार्च २०२६ रोजी या प्रकल्पाला अधिकृत तांत्रिक मान्यता दिली तांत्रिक मंजुरीनुसार इमारतीच्या बांधकामासाठी ३५ कोटी ९६ लाख २० हजार रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आता निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button