
कोकणातून अनिकेत तटकरे बिनविरोध निवडीबद्दल खेड भाजपातर्फे सत्कार

खेड : रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत ६ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने अनिकेत सुनील तटकरे यांची आमदारपदी बिनविरोध निवड निश्चित आहे. याबद्दल अनिकेत तटकरे यांना भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, राष्ट्रवादी महिला रत्नागिरी जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका दापोली नगरपंचायत साधना बोत्रे, दाऊद दूदूके, सुयश खेडेकर, स्वराज गांधी, प्रथमेश सुर्वे, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले आदी उपस्थित होते.
अनिकेत तटकरे यांच्या नेतृत्वातून कोकणाच्या विकासाला अधिक गती मिळून, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत प्रगतीचा नवा आदर्श निर्माण व्हावा, अशा शुभेच्छा यावेळी उपस्थितांनी दिल्या.




