अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा योजना


रत्नागिरी, दि. 13 ):- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राज्यातील मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी व्याज परतावा योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा व्यापक वापर, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा यावर भर देत महामंडळाने लाभार्थ्यांसाठी अनेक सोयीस्कर आणि नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
महामंडळामार्फत आजपर्यंत सुमारे 1 हजार 670 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक सहाय्य व्याज परतावा स्वरूपात वितरित करण्यात आले असून, राज्यातील 1 लाख 70 हजारांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 3367 लाभार्थ्यांना 2 कोटी 60 लाख रूपये, अर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 11 हजार 896 लाभार्थ्यांना 28 कोटी 53 लाख रूपये, अर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 8325 लाभार्थ्यांना 63 कोटी 55 लाख रूपये, अर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 16482 लाभार्थ्यांना 118 कोटी 29 लाख रूपये, अर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 15895 लाभार्थ्यांना 178 कोटी 81 लाख रूपये, अर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 24491 लाभार्थ्यांना 301 कोटी 2 लाख रूपये, अर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 46792 लाभार्थ्यांना 388 कोटी 88 लाख रूपये आणि अर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 49992 लाभार्थ्यांना 588 कोटी 69 लाख रूपये इतक्या रकमेचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.
लाभार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे योजनांविषयी अचूक, जलद आणि विश्वासार्ह माहिती मिळणे ही काळाची गरज बनली होती. याच पार्श्वभूमीवर महामंडळाने स्मार्ट बॉट आणि व्हॉट्सॲप सेवा सुरू करून एक मोठा डिजिटल टप्पा गाठला आहे.
लाभार्थ्यांना अनेकदा योजनांची माहिती, पात्रता, कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया किंवा व्यवसाय निवड यासंबंधी विविध प्रश्न निर्माण होतात. पूर्वी या माहितीसाठी कार्यालयीन भेटी, एजेंट्स किंवा दीर्घ प्रतीक्षा यांचा सामना करावा लागत होता. हीच अडचण दूर करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित (चॅट जीपीटी) स्मार्ट बॉट सुरू करण्यात आला आहे. हा स्मार्ट बॉट महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असून, २४x७ कार्यरत आहे.
महामंडळाने व्हॉट्सॲप सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे लाभार्थ्यांना त्यांच्या अर्जासंबंधित सर्व महत्त्वाची माहिती थेट मोबाईलवर मिळत आहे. व्हॉट्सॲप सेवेद्वारे लेटर ऑफ इंटेंट संबंधित अपडेट्स, क्लेम सादर केल्याची व प्रक्रिया स्थिती, मंजुरी बाबत माहिती, व्याज परतावा जमा झाल्याची सूचना व इतर माहिती टेमप्लेट द्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. महामंडळाचा अधिकृत व्हॉट्सॲप क्र. ८९७६८५५९२१ असून लाभार्थ्यांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर आलेल्या मेसेज ला 24 तासाच्या आत रिप्लाय करावा. जेणेकरुन या व्हॉट्सॲप द्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या प्रकरणाची सद्यस्थिती वेळोवेळी अवगत होईल व लाभार्थ्यांना कोणत्याही माहितीसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही. महामंडळामार्फत व्हॉट्सॲप चॅनेल सुरु करण्यात आले असून, त्याद्वारे महामंडळामार्फत सुरु करण्यात आलेले उपक्रम, नवीन परिपत्रके, शासन निर्णय व इतर महत्वाच्या बाबींची माहिती लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यात येत आहे. सदरच्या व्हॉट्सॲप चॅनेल ची लिंक महामंडळाच्या वेबपोर्टलवर उपलब्ध असून, ही लिंक पुढीलप्रमाणे देखील देण्यात येत आहे. https://whatsapp.com/channel/o२९VbBvVEoVyclodFnSu२H

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button