
मुंबईत सकाळीच पावसाची हजेरी रत्नागिरीतही पावसाची थोडीफार हजेरी
मुंबईकरांची अखेर पावसाची प्रतीक्षा संपली आहे. आज अचानक मुंबईसह संपूर्ण उपनगरांमध्ये हवामानात मोठा बदल झाला असून पावसाला सुरूवात झाली. सकाळपासूनच सुमारास आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली.सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुंबई आणि उपनगरात पावसाने धुवांधार एन्ट्री केली आहे. मुंबई, ठाणे, वसई, कल्याण आणि पनवेलसह मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली.
रत्नागिरी शहरातही आज सकाळी पावसाने थोडीफार हजेरी लावली मात्र सकाळपासून पावसाळी वातावरण आहे




