हर्णे समुद्र किनाऱ्यावर घोस्ट नेस्ट हटाव मोहीम, 115 किलो टाकाऊ फिशिंग नेट्स हटवून सागरी जीवांना दिला दिलासा


दापोलीः- जागतिक कांदळवन दिनानिमित्त जेएनके मरीन ॲक्वा लाईफ हर्णै रत्नागिरी ऑर्नामेंटल फिश फार्मर ट्रस्ट, वाईल्ड ॲनिमल रेस्क्यु ट्रस्ट दापोली आणि सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हर्णे यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णे समुद्र किनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेल्या टाकाऊ फिशिंग जाळे काढण्यासाठी स्वच्छता व बचाव मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली.
या मोहिमेत समुद्री कासव, मासे, खेकडे, प्रवाळ तसेच इतर सागरी जीवांसाठी धोकादायक ठरत असलेले सुमारे 115 किलो खराब व टाकाऊ फिशिंग नेट्स समुद्र किनाऱ्यावरील खडकांमधून काढून सुरक्षितरित्या विल्हेवाटीसाठी जमा करण्यात आले. या उपक्रमास वाईल्ड ॲनिमल रेस्क्यू ट्रस्ट दापोलीचे सचिव तुषार महाडीक, व त्यांची टीम, दापोली वनविभाग वनरक्षक प्रभू साबणे, विश्वंभर झाडे, शुभांगी गुरव,सेवा चॅरिटेबल ट्रस्ट हर्णे च्या अध्यक्षा सना काझी, उपाध्यक्षा सारिका पवार, रत्नागिरी ऑर्नामेंटल फिश फार्मर ट्रस्टचे अध्यक्ष फहाद जमादार तसेच ग्रामपंचायत हर्णैचे कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी सागरी जैवविविधतेचे संरक्षण, समुद्री प्रदूषण रोखणे आणि किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याची सामूहिक जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली. उपस्थितांनी भविष्यातही अशा पर्यावरणपूरक मोहिमा नियमितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या यशस्वी उपक्रमामुळे हर्णै समुद्र किनाऱ्यावरील सागरी परिसंस्थेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे योगदान मिळाले असून स्थानिक नागरिकांनीही या मोहिमेचे स्वागत केले.
फोटो डिपी 29-03 घोस्ट नेस्ट हटाव मोहिमेत सहभागी विविध संस्थांचे कार्यकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button