
अभिजित शेट्ये यांच्यावर भाजप रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा कार्यकारिणीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी देवरुख येथील सक्रिय कार्यकर्ते अभिजित शेट्ये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी अधिकृत पत्राद्वारे त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
नियुक्तीनंतर जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी अभिजित शेट्ये यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पक्ष संघटना अधिक सक्षम आणि मजबूत करण्यासाठी ते आहे. प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या नियुक्तीमुळे संगमेश्वर व देवरुख परिसरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी शेट्ये यांची नियुक्ती महत्त्वाची ठरणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.




