बावनदी पुलावरून तरुणाची नदीत उडी; शोधमोहीम सुरू


रत्नागिरी तालुक्यातील बावनदी येथील जुन्या पुलावरून एका ४२ वर्षीय व्यक्तीने शुक्रवारी सकाळी नदीत उडी घेतल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

रेवाळेवाडी (ता. संगमेश्वर) येथील महेश नारायण भरणकर (वय ४२) यांनी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास पुलावरून नदीत उडी घेतली. उपस्थित नागरिकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यापूर्वीच त्यांनी नदीत झेप घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून नदी परिसरात महेश भरणकर यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button