सीईटीत किती विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल, एमबीए-एमएमएस सीईटीचा निकाल जाहीर!

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) एप्रिल २०२६ मध्ये घेतलेल्या मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन-मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमबीए-एमएमएस ) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या संधीचा सीईटी प्रवेश परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत आठ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण मिळाले असून यातील दोन विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील आहेत.

एमबीए-एमएमएसच्या पहिल्या संधीची

व्यवस्थापन अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा ६ ते ८ एप्रिल या तीन दिवसात पाच सत्रात घेण्यात आली. या सीईटीसाठी एकूण १ लाख ३२ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख १६ हजार १९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात राज्यातील १ लाख १२ हजार ६०१ तर राज्याबाहेरील ३ हजार ५९५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल सोमवारी सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आला. या परीक्षेत आठ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले. यामध्ये ६ विद्यार्थी व २ विद्यार्थिनी आहेत. तसेच १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ६ विद्यार्थी राज्यातील असून २ विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरील आहेत. हा निकाल विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सीईटी कक्षाकडून सांगण्यात आले. ही सीईटी राज्यातील ३६ जिल्ह्यातील १८१ परीक्षा केंद्रावर संगणकाधारित पद्धतीने घेण्यात आली होती. यंदा महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर सीईटी घेण्यात आली नव्हती.

१०० पर्सेंटाईल मिळविणारे ८ विद्यार्थी

एमबीए-एमएमएसच्या सीईटीमध्ये एकूण ८ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले आहेत. राज्यातील नाशिक येथील साहील गाजरे, नागपूर येथील पार्थ मालसरिया, नमन अग्रवाल व यशोधरा राठोड, मुंबई येथील शशांक प्रभू ,अमरावती येथील शुभांगी ठाकूर या सहा विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले आहे. तसेच राज्याबाहेरील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथील अक्षय प्रधान व उत्तराखंडमधील डेहराडून येथील रुद्र कैनतुरा या विद्यार्थ्यांनी सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल मिळविले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button