
मच्छीमार बोटीवर सुतारकाम करताना जखमी झालेल्या तरूणाचा उपचाराच्या दरम्याने मृत्यू
मच्छीमार बोटीवर सुतारकाम करताना ड्रील होल पाना लागून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. चंद्रकांत यशवंत गोळपकर (६०, रा. कासारवेली, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. चंद्रकांत हे कासारवेली येथील रहिवासी असून ते २८ मे रोजी मच्छीमार बोटीवर सुतारकाम करत असताना ही दुर्घटना घडली.
मच्छीमार बोटीवर काम करत असताना ड्रील होल पाना त्यांच्या छातीला लागल्याने ते बेशुद्ध पडले. उपचारासाठी त्यांना तातडीने उपचारासाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचारासादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात आहे. करण्यात आली.www.konkantoday.com



