
रत्नागिरी-कोळंबे मार्गावरील लक्ष्मीकेशवनगर येथे दुचाकीवरुन पडून महिला जखमी
रत्नागिरी-कोळंबे मार्गावरील लक्ष्मीकेशवनगर येथे दुचाकीवरुन पडून महिला जखमी झाली. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. विद्या संतोष लाखण (४८, रा. मानखुर्द मुंबई) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार करण्यात येत आहेत. विद्या लाखण या १८ मे रोजी पती व मुलांसह रत्नागिरी येथे नातेवाईकांकडून राहण्यासाठी आल्या होत्या. दि. २८ मे रोजी पती संतोष लाखण याच्या मोटारसायकलवर बसून त्या कोळंबे येथे जात होत्या. दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीकेशव नगर येथे त्या दुचाकीवरुन पडून जखमी झाल्या. याबाबत पोलिसांत करण्यात नोंद करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




