महिनाअखेरीस सीएनजीCNG ग्राहकांना पुन्हा धक्का; दरात २ रुपयांची वाढ


मुंबई : वाहनचालकांना महिनाअखेरीस पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर क्षेत्रात सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर तत्काळ लागू झाले आहेत.

गॅस वितरण करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड (MGL) कंपनीने जाहीर केलेल्या नव्या दरांनुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील ग्राहकांना आता सीएनजीसाठी ८६ रुपये प्रति किलो मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी १४ मे रोजीही कंपनीने दरात २ रुपयांची वाढ केली होती.

एमजीएलकडून मुंबई महानगर क्षेत्रासह कल्याण, रायगड, रत्नागिरी, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि इतर काही भागांमध्ये सीएनजीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांवर होणार आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये टॅक्सी, रिक्षा, बस तसेच खासगी वाहनांसाठी सीएनजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सलग दुसऱ्यांदा झालेल्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही होऊ शकतो.

दरवाढीमागील नेमकी कारणे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी वाढलेल्या दरांमुळे सीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांच्या खर्चात आणखी वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button