
कोकण विधान परिषद निवडणुकीत अजितदादांची राष्ट्रवादी व शिंदे शिवसेनेत रस्सीखेच
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस १ जून (सोमवार) आहे. अवघे ४ काही दिवस शिल्लक राहिले असलले तरी अजून महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यात आमदार भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले शिवसेनेकडून इच्छूक आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुनिल तटकरे यांचा मुलगा अनिकेत तटकरे इच्छुक आहे. उमेदवारीसाठी या दोघांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे कोणाला उमेदवार मिळणार याकडे कोकणाचे लक्ष लगून आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी हे या निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहाणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या निवडणुकीसाठी
उमेदवार अर्ज भरण्याचे मोजकेच दिवस शिल्लक आहेत. ईदची सुट्टी वगळता उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी केवळ ४ दिवस शिल्लक आहे. मात्र, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या मतदारसंघाचे नेतृत्व यापूर्वी खासदार सुनिल तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी केले होते. मात्र, आता कोकणातील बदललेले राजकीय समीकरण आणि शिवसेनेचे (शिंदे गट) वाढलेले संख्याबळ पाहाता, ही जागा आपल्याकडेच खेचून आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. आमचे संख्याबळ राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट असल्याने ही जागा शिवसेनेलाच मिळाली पाहिजे,’ असा स्पष्ट आणि आक्रमक पवित्रा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.www.konkantoday.com




