दापोली उपजिल्हा रुग्णालय निवासस्थान विनावापर


दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान प्रकल्पाचे काम पूर्ण होऊनही इमारत अद्याप ताब्यात मिळालेली नसल्याची माहिती समोर आली आहे. विद्युतिकरणाचे काम अपूर्ण राहिल्यामुळे ही इमारत दोन वर्षांपासून वापराविना पडून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या पत्रानुसार, रुग्णालयाच्या आवारात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे
काम रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. या प्रकल्पातील स्थापत्य विभागाचे काम मार्च २०२३ मध्ये पूर्ण झाले होते. मात्र निधीअभावी विद्युतिकरणाचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे इमारत रुग्णालय संबंधित प्रशासनाकडे हस्तांतरित केलेली नाही सध्या विद्युत रोहित्र बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, लिफ्ट व मीटर
बसवण्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याचे पंत्रात नमूद करण्यात आले आले आहे विद्युत विभाग, सार्वजनिक आरोग्य भवन मुंबई यांच्या माध्यमातून आवश्यक कार्यकारी आदेश देण्यात आले असून, उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत केवळ अपूर्ण विद्युत कामामुळे वापराविना पडून राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे रुग्णालयातील अधिकारी कर्मचार्‍यांना निवासी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी उरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button