जिल्ह्यात ५५ गावे, १२९ वाड्या टँकरच्या भरवशावर


ऊन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद होत चालले आहे. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक जलस्रोत आटू लागल्याने अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असून, प्रशासनालाही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील ५५ गावे आणि १२९ वाड्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून, तब्बल ४२ हजार ६३५ नागरिक या संकटाचा सामना करीत आहेत. या भागांमध्ये सध्या ३ शासकीय आणि १५ खासगी अशा एकूण १८ टैंकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू असून आतापर्यंत १६४४ फेर्‍या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक झळ जिल्ह्यातील सर्वाधिक गंभीर परिस्थिती रत्नागिरी तालुक्यात दिसून येत आहे. तालुक्यातील १० गावे आणि ३९ वाड्यांमधील २३ हजार ७११ नागरिक सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत. या भागात पाणीपुरवठ्यासाठी साठी १० १० खासगी टँकर्स कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत १०७८ फेर्‍या मारल्या आहेत. जिल्ह्यातील पिण्याचे पाणी एकूण टंचाईग्रस्त लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या रत्नागिरी तालुक्यात असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
संगमेश्वरमध्येही चिंताजनक स्थिती संगमेश्वर तालुक्यातील १५ गावे आणि ३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. येथे ६ हजार ५१८ नागरिक प्रभावित झाले असून त्यांच्या पाण्यानी गरज भागविण्यासाठी १ शासकीय १० गावे आणि २४ वाड्यांतील २ हजार ९१९ नागरिक टैंकर ख्या पाण्यानर अवलंबून आहेत, तर खेड तालुक्यातील आणि २ खासगी टँकर कार्यरत आहेत. वाढत्या तापमानामुळे येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडणगड, चिपळूण आणि खेडमध्येही टँकरचा आधार मंडणगड तालुक्यातील ६ गावे आणि ६ वाड्यांमधील ५ हजार २६५ नागरिकांना एक खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरने आतापर्यंत २१४ फेर्‍या पूर्ण केल्या आहेत. चिपळूण तालुक्यातील ११ गावे आणि २१ वाड्यांमधील १ हजार ४१६ नागरिकांना एका शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button