महागाईचा भडका अन् खिशाला फटका! पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढपेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ


पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागले आहे. पेट्रोलच्या दरात 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 2.17 रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत इंधनाच्या दरात दरवाढ होण्याची ही चौथी वेळ आहे.आज, 25 मे रोजी सकाळी 6 वाजल्यापासून देशभरात इंधनाचे नवे दर लागू झाले आहेत.
गेल्या दहा दिवसांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमधील ही चाैथी वाढ आहे. जर इराण आणि अमेरिका युद्ध थांबलेच नाही तर किमतीमध्ये अशीच वाढ होईल. महागाई वाढत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन करत म्हटले होते की, नागरिकांनी पेट्रोल आणि डिझेलचा व्यवस्थित वापर करून काटकसरीने वापरावे. शिवाय विदेश यात्रा टाळण्याचेही आवाहन केले होते.

होर्मुज खाडी बंद असल्याने तेल पुरवठा होण्यास समस्या येत आहे. शिवाय आखाती देशात युद्धाचे ढग असल्याने रिफानरीवरही ताण आहे. अनेक देशात लॉकडाऊनही स्थिती आहे. परकिय चलणावरील दबाव कमी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने पुढील 1 वर्षाकरिता खरेदी न करण्याचे आवाहन केले. शिवाय एलपीजी गॅसचाही मोठा तुटवडा आहे.

इराण आणि अमेरिका युद्धाची मोठी झळ भारताला बसताना दिसत आहे. परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. यादरम्यान भारताचे अनेक मित्र भारताच्या मदतीला धावले आहेत. होर्मुज खाडी खुली करण्याकरिता इराणवर आता जगाचा दबाव वाढू लागला आहे. इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यात हे युद्ध असली तरीही संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button