रजिस्टर चोरट्यांची गाडी भाड्याची; गाडी कर्नाटकमधील


राजापूर आणि संगमेश्वर येथील हॉटेलमधील नोंदणी रजिस्टर चोरून पोबारा करणार्‍या चोरट्यांची गाडी भाड्याचे असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळत असून मालकाच्या माहितीवरून चोरट्यांचा तपास लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. तसेच नोंदणी रजिस्टर नक्की कोणत्या हेतूने चोरली जात असल्याचा तपास लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमवारी सायंकाळी राजापूर येथील हॉटेलमधील रजिस्टर चोरीनंतर संगमेश्वर येथील एका हॉटेलमधून रजिस्टर आणि त्यामध्ये ठेवलेले पैसे चोरले गेल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमेश्वर पोलिसांनी नाकेबंदी करत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र तुरळ येथे हुंडाई गाडी तसेच सोडून चोरट्यांनी जंगलात पलायन केले होते. चोरट्यांनी चोरलेली गाडी ही कर्नाटकमधील एका मालकाकडून भाडेतत्वावर घेतल्याची माहिती पुढे येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button