पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना पोलीस महासंचालक पदक मिळाल्याबद्दल युवासेनेकडून अभिनंदन

रत्नागिरी : पोलीस दलातील उल्लेखनीय सेवा आणि विशेष कामगिरीची दखल घेत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना मानाचे पोलीस महासंचालक पदक नुकतेच प्रदान करण्यात आले. याबद्दल रत्नागिरी जिल्हा आणि पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
श्री. पाटील यांच्या या सन्मानाचे औचित्य साधून युवासेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत तालुका प्रमुख संदेश नारगुडे आणि उपतालुका प्रमुख रितेश लोखंडे उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांनी विवेक पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. श्री. पाटील यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्यात आणि गुन्हेगारीवर वचक बसवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या विज्ञानाधारित तपास आणि विशेष मोहिमांमधील योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे.
“विवेक पाटील यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यामुळे रत्नागिरीतील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ झाली आहे. त्यांना मिळालेला हा सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे,” असे यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button