प. महाराष्ट्राला जोडणार्‍या कुंभार्ली घाटाच्या दुरूस्तीबाबत साशंकता


चिपळूण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुहागर-विजापूर राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचे जाहीर केल्यानंतर ३ जानेवारी २०१७ रोजी त्यावर अंमलबजावणी होऊन या मार्गाला महामार्गाचा दर्जा मिळाला.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंडळाने सातारा जिल्हयातील आपल्या ताब्यात असलेला रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करून त्याची विकासात्मक कामेही हाती घेतली. मात्र जिल्हयातील हस्तांतरण रखडले होते. सार्वजनिक बांधकाम मंडळाने गुहागर- विजापूर महामार्गतील आपल्या ताब्यात असलेला कुंभार्ली घाटमाथा ते पिंपळी दरम्यानचा २१ कि. मी. आणि रामपूर ते चिपळूण बायपासदरम्यानचा १५ कि. मी. असा ३६ कि.मी.चा रस्ता महामार्गाकडे सहा महिन्यापूर्वीच हस्तांतरित केला. रस्ता ताब्यात आल्यानंतर महामार्ग विभागाने दुस्तीलाही सुरवात केली आहे.
गुहागर-विजापूरचे प्या टप्प्याने कॉक्रिटीकरण केले जात आहे. रामपूर ते गुहागर, त्यानंतर बहादूरशेख नाका ते पिंपळीपर्यंतच्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण झाले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button