
शासनाकडून घोषणा होवूनही रास्त धान्य दुकानांना रॉकेलची प्रतीक्षाच
सध्याच्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने त्याला रॉ केलचा पर्याय आणला आहे. हे रॉ केल रेशन दुकानांमधून मिळणार असल्याची घोषणा करुन महिना झाला तरी त्याची प्रतिक्षाच आहे. यामुळे शिधापत्रिकाधारकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
अमेरिका, ईस्त्रायल, इराण यांच्यात युध्द सुरू असल्याने त्याचा परिणाम विविध वस्तूंच्या उपलब्धतेवर झाला आहे. याचा सर्वाधिक फटका घरगुती व व्यावसायिक सिलेंडरला बसला आहे. त्यामुळे त्याच्या वितरणात बर्याच अटी आणण्यात आल्या असून व्यावसायिक सिलिंडरला मिळवण्यासाठी आजही मोठी कसरत करावी लागत असल्याने हॉटेलमधील बहुतांशी खाद्यपदार्थ आजही गायबच आहेत. गॅस टंचाईचा सर्वसामान्यांना अधिक त्रास होऊ नये म्हणून शासनाने त्यावर रॉकेलचा पर्याय आणला आहे. त्यानुसार केंद्र शासनाने राज्याला ३४ लाख ४४ हजार लिटर रॉकेल दिले असून त्यातील ८४ हजार लिटर रॉकेल जिल्ह्याला मिळणार आहे
त्याचे वितरण रेशन दुकानांमधून होणार असून अंत्योदय, प्राधान्य कुटुंबानाच प्रति शिधापत्रिका मार्च महिन्यापासून ३ लीटर रॉ केल मिळणार आहे. स्वतांतरित मजुरांना त्यांनी केंद्र, राज्य शासनाचे ओळखपत्र दाखवल्यास उपलब्धतेनुसार रकिल दिले जाणार आहे.www.konkantoday.com




