राज्य निपुणता केंद्रासाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता प्रवेश निवड चाचण्या दि. ११ ते १९ मे कालावधीत


रत्नागिरी, दि. ४ ) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे कार्यरत राज्य निपुणता केंद्रासाठी सन २०२६-२७ या वर्षाकरिता प्रवेश निवड चाचण्या दि. ११ ते १९ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
या अंतर्गत अॕथलेटिक्स, शूटिंग व सायकलिंग या खेळांच्या चाचण्या होणार असून राज्यस्तरावरील प्राविण्यधारक तसेच राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंना संधी उपलब्ध आहे. अॕथलेटिक्ससाठी वयोमर्यादा २० वर्षांखालील, सायकलिंगसाठी १२ ते १४ वर्षे, तर शूटिंगसाठी १४ ते २० वर्षे अशी निश्चित करण्यात आली आहे.
अॕथलेटिक्स व सायकलिंगच्या चाचण्या दि. ११ व १२ मे रोजी, तर शूटिंगच्या चाचण्या दि. १८ व १९ मे २०२६ रोजी शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे येथे होणार आहेत.
कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील पात्र खेळाडूंनी तसेच शैक्षणिक व क्रीडा संस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, कोल्हापूर विभागाचे सुहास पाटील यांनी केले आहे.
000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button