
अंमली पदार्थाची विक्री करणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात;६६ हजारा मुद्देमाल जप्त
रत्नागिरी : शहरातील कोकणनगर- साईभूमीनगर अपार्टमेंटच्या पाठीमागे ५.५ ग्रॅम वजनाचा ६६ हजार रुपयांचा अंमली पदार्थ विक्री करणाऱा तरुण पोलिसांच्या जाळ्यात अडकला. संशयित तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरमान लियाकत धामस्कर (वय २७, रा. सी-२ साईभूमीनगर, जे. के. फाईल्स रत्नागिरी) असे संशयित अंमली पदार्थ्यांची विक्री व स्वतःकडे बाळगणाऱ्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साईभूमीनगर अपार्टमेंट्या मागील बाजूस निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताकडे विक्री करण्याच्या उद्देशाने ५.५ ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉइन हा अंमली सदृश्य पदार्थ सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल शरद जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




