
रत्नागिरी जिल्ह्यातील ९ जणांना मिळणार पोलिस महासंचालक पदक
रत्नागिरी : पोलिस दलात विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांना पोलिस महासंचालक पदक देऊन सन्मान करण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ९ पोलिसांना पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. हे पदक उद्या (१ मे) शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
यामध्ये रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, सहायक पोलिस फौजदार सचिन घाग, मारुती हलगी, अशोक राठोड, संदेश चव्हाण, नागरिक हक्क संरक्षण पथकातील मोरेश्वर मयेकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक गोठणकर, लक्ष्मण कोकरे, पोपट गवाणे आणि महिला पोलिस शिपाई शीतल पिंजरे यांचा समावेश आहे.
पदक जाहीर झाल्यानंतर पोलिस अधीक्षक नितिन बगाटे, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) राधिका फडके आणि पोलिस उपविभागीय अधिकारी निलेश माईनकर यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे.




