दापोली शहरातील वळणे येथे दोन लाखांचा गुटखा जप्त


दापोली शहरानजीक वळणे येथे दापोली पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत गुटखा तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला असून विक्रीसाठी बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत इर्टिगा कारसह सुमारे ७ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई सोमवारी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार यादव हे आपल्या पथकासह दापोली-दाभोळ मार्गावर नियमित पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी वळणे परिसरात रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत उभी असलेली इर्टिगा कार त्यांच्या निदर्शनास आली. वाहनाच्या काचांवर पडदे लावलेले असल्याने संशय अधिक बळावला. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता गाडीत बॉक्सच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवलेला आढळून आला. प्राथमिक चौकशीत हा गुटखा अनधिकृतरित्या विक्रीसाठी वाहतूक केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या गुटख्याची किंमत सुमारे २ लाख ४० हजार रुपये असल्याचे समोर आले असून, वाहनातह एकूण जप्तीचा आकडा ७ लाख ४० हजारांपर्यंत पोहोचला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button