
साखरपा सरपंच पोटनिवडणूक : रश्मी साळसकर १२४ मतांनी विजयी
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा ग्रामपंचायतीच्या सरपंच पोटनिवडणुकीत रश्मी रवींद्र साळसकर यांनी प्रतिस्पर्धी भाग्यश्री संजय सुर्वे यांचा १२४ मतांनी पराभव करत
विजय मिळवला.
या निवडणुकीत एकूण ८२४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये रश्मी साळसकर यांना ४६३ मते मिळाली, तर भाग्यश्री सुर्वे यांना ३३९ मते मिळाली. तसेच २२ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला.




