
जयगड-लावगणमध्ये ’गोवा शिपयार्ड’ प्रकल्प उभा राहणार, संचालक ऍड. दीपक पटवर्धन यांची महत्वपूर्ण भूमिका
जिल्ह्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीला गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेड या नामांकित कंपनीचा सुमारे २५०० कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प तालुक्यातील जयगड नजीकच्या लावगण येथे साकारला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी रत्नागिरीचे सुपुत्र आणि ’जीएसएल’चे स्वतंत्र संचालक ऍड. दीपक पटवर्धन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे
लावगण परिसरात १०० एकर जागेवर हा अत्याधुनिक प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध झाली आहे. कंपनीकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर सुमारे ३००० स्थानिक युवक-युवतीना थेट रोजगार उपलब्ध होईल. अप्रत्यक्षरीत्या सेवा आणि व्यवसाय क्षेत्रात हजारो कुटुबांना उपजीविकेचे साधन मिळणार आहे.
रत्नागिरीच्या सुपुत्रासह मंत्र्यांचा मोलाचा पाठपुरावा कंपनीचे स्वतंत्र सचालक ऍड. पटवर्धन यांच्या कार्यकाळातच या प्रकल्पाला मंजुरी मिळणे हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. हा प्रकल्प रत्नागिरीतच व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत आणि मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश लाभले आहे.www.konkantoday.com



