
किल्ले रत्नदुर्ग येथे महादरवाजा संवर्धन मोहीम
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या (महाराष्ट्र राज्य) रत्नागिरी विभागगातर्फे येथील किल्ले रत्नदुर्ग येथे महादरवाजा संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (२६ एप्रिल) सकाळी ८ वाजता रत्नदुर्ग किल्ला, महादरवाजा परिसरात या मोहिमेला सुरुवात होईल.
आपल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे या मोहिमेत शिवप्रेमींनी, गडप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी गडकिल्ले सेवक 9920905920 / 7666708201 यांच्याशी संपर्क साधावा.




