प्रतिबंधित असलेले पानमसाला, तंबाखूची विक्री; रत्नागिरीत तिघांवर कारवाई


बंदी असलेले पानमसाला, तंबाखू हे पदार्थ विक्रीसाठी आपल्या ताब्यात बाळगणाऱ्या रत्नागिरी शहरातील तिन जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार 17 एप्रिल रोजी दुपारी 2 ते सायंकाळी 4.30 वा.कालावधीत करण्यात आली आहे.संशयितांकडून एकूण 11 हजार 518 रुपयांचे पानमसाला आणि तंबाखूचे 79 पॅकेट आणि 649 पाउच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

स्वप्निल नरेंद्र गावखडकर (40,रा.तेली आळी,रत्नागिरी),संजय पांडूरंग तावडे (41,रा.शिवाजीनगर,रत्नागिरी) आणि महेंद्र रघूनाथ सावंतदेसाई (59,रा.शिवाजीनगर,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात अन्न सूरक्षा अधिकारी तृप्ती व्यंकटेश घरत (29,रा.साळवी स्टॉप,रत्नागिरी) यांन शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button