सहकार क्षेत्रात निवडणुकीचे धुमशान; वर्षभरात होणार इतक्या संस्थांच्या निवडणुका.!

सहकारी संस्था : अशा सर्व संस्थांच्या आणि ज्या संस्थांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे, अशा ११, ०४१ संस्थांच्या निवडणुका चालू वर्षांत होणार आहेत. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका विविध कारणांमुळे २०२४ पासून पुढे ढकलण्यात आल्या होत्या. लोकसभा आणि राज्य विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे २०२४ मध्ये निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. गतवर्षी अवकाळी, अतिवृष्टी, महापुरामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे आणि चालू वर्षांच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

दरवर्षी साधारणपणे सहा ते सात हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होतात. पण, २०२४ पासून विविध कारणांमुळे संचालक मंडळाचा कार्यकाळ संपलेल्या संस्थांच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे चालू वर्षांत ११,०४१ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात अ गटातील ७४ संस्था, ब गटातील १,३३३ संस्था, क गटातील ३,९४१ संस्था आणि ड गटातील ५,६९३ संस्थांच्या निवडणुकी होणार आहेत.

सध्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक सुरू असल्यामुळे अहिल्यानगरमधील आणि बारामती विधानसभेची पोट निवडणूक सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. आचारसंहिता संपताच दोन्ही जिल्ह्यांतील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

संबंधित जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादी तयार करणे आणि दुरुस्ती, सुधारणा करून ती अंतिम करण्याची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आली आहे. मतदार यादी अंतिम झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे. निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे काम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्याकडून केले जाते.

निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

राज्यात दरवर्षी सुमारे सहा ते सात हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होतात. २०२४ पासून विविध कारणांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे चालू वर्षांत ११,०४१ सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत, अशी माहिती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण, पुणे आयुक्त अनिल कवडे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button