गंभीर व दुर्धर रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार


गंभीर व दुर्धर आजारांशी झुंज देणार्‍या रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार ठरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील या कक्षाच्या प्रभावी कामगिरीमुळे जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही काळात प्राप्त झालेल्या १५१ अर्जापैकी तब्बल १०३ रुग्णांना प्रत्यक्ष ७३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरांमध्ये जावे लागते. या उपचारांचा खर्च अनेकदा परवडणारा. नसतो. अशा परिस्थितीत शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळणारी मदत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दिलासा ठरत आहे. निधी कक्षामार्फत रुग्णांच्या आजारानुसार आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. त्यामध्ये ३१ रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी लाख रुपये, ४५ रुग्णांना ५० हजार रुपये, ४ रुग्णांना ७५ हजार रुपये, २ रुग्णांना प्रत्येकी २ लाख रुपये, ४ रुग्णांना ८० हजार रुपये, ६ रुग्णांना ७० हजार रुपये तर उर्वरित १० रुग्णांना ३० हजार ते ९० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण १०३ रुग्णांना ७३ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button