पदवीधर शिक्षक समायोजन प्रक्रियेला रत्नागिरी जिल्हयात यशस्वीरित्या पूर्णविराम, १०५७ शिक्षकांना जिल्ह्यातच संधी
गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पदवीधर शिक्षक समायोजन प्रक्रियेला रत्नागिरी जिल्हयात यशस्वीरित्या पूर्णविराम मिळाला आहे. २०२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत राज्य शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयामुळे जिल्ह्यातील तब्बल १०५७ शिक्षकांचा प्रश्न कायमचा मार्गी लागला असून त्यांना जिल्ह्यातच काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील मराठी माध्यमाचे ११८ आणि उर्दू माध्यमाचे १७ अशा एकूण १३५ अतिरिक्त शिक्षकांचे समुपदेशन पार पडले आहे. समायोजन झाले नसते तर या शिक्षकांना सांगली, सातारा किंवा गडचिरोली यांसारख्या लांबच्या जिल्ह्यांमध्ये जावे लागले असते. मात्र, आता हे सर्व शिक्षक जिल्ह्यातच स्थिरावणार असल्याने शिक्षक संघटना आणि कुटुंबियांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.

www.konkantoday.com