
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्यावर रत्नागिरीत भाजपा रत्नागिरीच्या वतीने व्याख्यान संपन्न

रत्नागिरी : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहरच्या वतीने भाजप जिल्हा कार्यालय येथे “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जीवनप्रवास, भारताच्या जडणघडणीत त्यांचे अमूल्य योगदान आणि त्यांना अपेक्षित असले सशक्त, समृद्ध व विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्या आचरणात ‘पंचपरिवर्तन’ स्वीकारण्याची आवश्यकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री. आशिष आठवले उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात श्री. आठवले यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रभक्ती, दूरदृष्टी, शिक्षण, उद्योग, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारतासाठी दिलेल्या योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. विकसित आणि आत्मनिर्भर भारताची उभारणी केवळ शासनाच्या योजनांमुळे नव्हे, तर प्रत्येक नागरिकाच्या आचरणातील सकारात्मक परिवर्तनामुळे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाने स्वीकारले ‘पंचपरिवर्तन’ हे केवळ संघटनात्मक अभियान नसून विकसित भारताच्या दिशेने प्रत्येक नागरिकाने स्वीकारावयाची जीवनशैली आहे. स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि ‘स्व’बोध या पंचसूत्रांचा स्वीकार करूनच डॉ. मुखर्जी यांचे राष्ट्रनिर्मितीचे स्वप्न अधिक प्रभावीपणे साकार होऊ शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संयोजक श्री. निलेश मराठे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. यानंतर भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष श्री. अशोक वाडेकर यांच्या हस्ते प्रमुख वक्ते श्री. आशिष आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
व्याख्यानानंतर भाजप जिल्हा पदाधिकारी श्री. राजन फाळके तसेच भाजप शहर महिला अध्यक्षा सौ. भक्तीताई दळी यांच्या हस्ते प्रमुख वक्त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजपचे नगरसेवक श्री. नितीन जाधव, श्री. संदीप (बाबू) सुर्वे, सरचिटणीस श्री. निलेश आखाडे, श्री. संतोष सावंत, श्री. नितीन गांगण, श्री. प्रसाद बाष्टे, श्री. शंकर शिंदे, श्री. विजय माळवदे, श्री. शैलेश बेर्डे, श्री. विकी जैन तसेच महिला मोर्चाच्या सौ. सोनाली आंबेरकर, सौ. सायली बेर्डे, सौ. सोनाली केसरकर, सौ. संगीता कवितके, सौ. विजया भाटकर यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे जिल्हा, शहर, महिला मोर्चा, युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजक श्री. निलेश मराठे तसेच सहसंयोजक श्री. संकेत कदम आणि सौ. सारिका शर्मा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व समारोप श्री. निलेश मराठे यांनी केले. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला.




