मुंबई-गोवा महामार्गावर एलसीबीचा मोठा दणका; अवैध गुटख्यासह ३०.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त


महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) मोठा दणका दिला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील खर्येवाडी परिसरात केलेल्या कारवाईत २१ लाख ६३ हजार ४५० रुपयांचा गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ, तसेच ८ लाख ५० हजार रुपयांचा अशोक लेलँड ‘बडा दोस्त’ टेम्पो असा एकूण ३० लाख १३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई काल शुक्रवारी ३ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ओरोस येथील खर्येवाडीतील खालसा पंजाबी ढाब्यासमोर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आली. बांदा येथून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोतून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार वाहन तपासणीदरम्यान संशयित टेम्पो थांबवून झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.या प्रकरणी गोपाळ राजाराम गवस (३४, रा. दाणोली अन्नपूर्णावाडी, ता. सावंतवाडी), शिरीष सुभाष गवळी (३५, रा. माठेवाडा, सावंतवाडी) आणि सिद्धेश सुभाष केसरकर (३४, रा. आळेवाडी, बांदा, ता. सावंतवाडी) यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा, 2006 तसेच भारतीय न्यायसंहिता, 2023 मधील विविध कलमान्वये सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग कडून देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button