शिवसेना पक्षाचे पावस जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलेले जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड . महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर यांचा अनोखा उपक्रम….

फेब्रुवारी 2026 मध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये पावस जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे ॲड.महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर हे भरघोस मतांनी निवडून आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेनेने एकतर्फा बाजी मारत जवळपास 41 सीट निवडून आणल्या. तसेच मित्र पक्ष मिळून एक हत्ती सत्ता मिळवली. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये सर्व पक्ष मिळून 56 जिल्हा परिषद सदस्य आहेत.
महेंद्र मांडवकर हे व्यवसायाने वकील असल्यामुळे सर्वांना जिल्हा परिषद कायदा हा पूर्णपणे माहीत असावा असा एक वेगळा हेतू ठेवून त्यांनी स्वतःच्या पक्षाचे म्हणजेच शिवसेनेचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे मित्र पक्षाचे सर्व सदस्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विरोधी पक्षातील देखील सर्व सदस्य यांना. मोफत जिल्हा परिषद कायद्याचे 2026 सालातील नवीन पुस्तक भेट म्हणून दिली. सदरची सर्व पुस्तके त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे मॅडम आणि उपाध्यक्ष माननीय विलासजी चाळके साहेब यांच्या हस्ते सर्व सभासदांना प्रदान केली. त्यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय राहुलजी पंडित साहेब तसेच तालुका अध्यक्ष बाबू शेठ म्हाप , शिक्षण सभापती माननीय नंदकुमार मुरकर साहेब , समाज कल्याण सभापती माननीय ॲड . सुयोग कांबळे साहेब , महिला बाल कल्याण सभापती माननीय शिर्के मॅडम , तसेच अन्य जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नक्कीच सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्याशी चर्चा केली असता यामागे शिवसेनेचे रत्नागिरीचे आमदार तथा पालकमंत्री व उद्योग मंत्री माननीय उदय जी सामंत साहेब यांची प्रेरणा आणि उपनेते माननीय श्री निलेश भगवान सांबरे साहेब यांचे मार्गदर्शन व विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button