
कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी नारायण राणे आग्रही
कोकणातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर रेल्वे पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. त्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे या संदर्भात त्यांनी सविस्तर पत्र पाठवून स्थानिक नागरिकांच्या अडचणी मांडल्या आहेत.
सन १९९८ पासून सुरू असलेली ही पॅसेंजर सेवा कोविड काळात बंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर ही गाडी पुन्हा सुरू करण्यात आलेली नाही. सध्या काही गाड्या दिवा स्थानकातून रत्नागिरीकडे सोडल्या जात असल्या तरी पश्चिम उपनगरात राहणार्या कोकणवासियांसाठी हा पर्याय अत्यंत गैरसोयीचा ठरत आहे. रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचा रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने मुंबईशी सतत संपर्क असतो त्यामुळे ही सेवा त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




