
पोलिसांनी वेळोवेळी कारवाई करूनही पर्यटकांची पुन्हा स्टंटबाजी सुरूच
दापोली तालुक्यातील मुरूड समुद्राकिनारी पर्यटकांनी स्टंटबाजी करत जोरदारपणे गाडी चालवत हुल्लडबाजी करत असल्याची घटना दिवसेंदिवस घडत आहेत. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होतं असून तातडीने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मुरूड समुद्रकिनारा सुरक्षित समुद्रकिनारा मानला जातो. या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. परंतु या हुल्लडबाज पर्यटकांमुळे या किनार्याला धोका निर्माण होत आहे. समुद्रकिनार्यांवर लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरीक आपल्या कुटुंबासोबत पर्यटनाला येतात. परंतु मद्यपी शिवाय अतिउत्साही पर्यटकांमुळे अनेक समस्यांचा सामना स्थानिकांना व पर्यटकांना करावा लागतो. मुरूड समुद्रकिनारी पार्कीगची सोय सुविधा स्थानिक प्रशासन अथवा पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटक आपल्या गाड्या समुद्राच्या पुळणीत घेवून जातात. शिवाय या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने पर्यटकाना आवरणे कठीण होत आहे.www.konkantoday.com




