सेंट थॉमस स्कूलच्या वैष्णवी प्रतिप पडवळे हिची महाराष्ट्राच्या अस्मिता खेलो इंडिया ( WIFA )फुटबॉल संघात निवड.

रत्नागिरी : कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलच्या वैष्णवी प्रतिप पडवळे हिची महाराष्ट्राच्या अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड झाली आहे. सेंट थॉमस स्कूल फुटबॉल संघातून एकूण ६ मुलींची राज्य शिबीरासाठी निवड करण्यात आली होती. त्यातून वैष्णवी प्रतिप पडवळे हिची महाराष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड झाली. गुजरात मधील भावनगर येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया झोनल फुटबॉल अंडर १३ संघामध्ये वैष्णवी प्रतिप पडवळे आपली उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे.

महाराष्ट्रातून एकूण ३४ मुलींची राज्यस्तरीय खेलो इंडिया फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. या मुलींमधून १४ मुलींची महाराष्ट्र अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड झाली आहे. त्यात वैष्णवी प्रतिप पडवळे हिचा समावेश आहे.

रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद परांजपे, सचिव धनराज मोरे यांचे मुलींच्या फुटबॉल संघासाठी वेळोवेळी विशेष सहकार्य करत आहेत. शाळेचे व्यवस्थापन, अजित धावडे, स्वप्नाली पवार हे क्रीडा शिक्षकदेखील वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत.

वैष्णवीच्या या यशाबद्दल शाळेचे व्यवस्थापक फादर थॉमस, मुख्याध्यापक फादर जॉर्ज, क्रीडा शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button