दापोली शहरातील मंडणगड रस्त्यालगत अवैध गुटखा विक्रीवर दापोली पोलिसांचा छापा


दापोली शहरातील मंडणगड रस्त्यालगत आंबा पॉईंट परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री करणार्‍या टपरीवर दापोली पोलिसांनी रविवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता धाड टाकून २४ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा पॉईंट येथील काळ्या वडापाव विक्री केंद्रासमोरील एका टपरीत अवैध गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसह छापा टाकला. तपासणीदरम्यान टपरीमध्ये सहा पांढ्या रंगाच्या गोण्या आढळून आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button